बुलढाणा: गेल्या अनेक वर्षापासून बुलढाणा जिल्हयावासियांना विमानतळाची प्रतीक्षा आहे. बुलढाणा जिल्हयाचे नाते राज्यातील मोठया शहरांशी जोडले जावे यासाठी दळणवळण अत्यंत महत्वाची भूमिका बजावते या पार्श्वभूमिवर जिल्हयात विमानतळाची नितांत आवश्यकता आहे. या मागणीसाठी जिल्हयातील सर्वपक्षीय आमदारांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात आवाज बुलंद करण्याची गरज आहे.
बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचे आजोळ अशी जगभरात बुलढाणा जिल्हयाची ओळख आहे. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा अग्रेसर आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हयाला गेल्या अनेक वर्षापासून लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न होत आहेत. कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रात जिल्हा झपाटयाने प्रगती करीत आहे. जगविख्यात पर्यटन स्थळ लोणार सरोवर जगातील विविध देशातील पर्यटकांना आकर्षित करीत आहे. संतश्री गजानन महाराजांची शेगाव नगरी तिथल्या पारदर्शी व्यवस्थापनामुळे देशभरात ओळखली जाते. जिल्हयातून गेलेल्या समृध्दी महामार्गामुळे जिल्हयाची औद्योगिक भरभराट होत आहे. त्यामुळे जिल्हयात एकतरी विमानतळ असावे अशी जिल्हावासीयांची रास्त अपेक्षा आहे. या अपेक्षापूर्तीसाठी जिल्हयाच्या सर्वपक्षीय कारभा-यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज बुलंद करणे गरजेचे आहे.
बॉक्स
जिल्हयातील अनेकजण नौकरी,व्यवसायाच्या निमित्ताने राज्याबाहेर तर काही विदेशात स्थायीक आहेत. त्यांना जिल्हयात येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हयात विमानतळाची नितांत आवश्यकता आहे.
बॉक्स..
विदर्भात नागपूर व अकोला येथेच विमानतळे आहेत त्यापैकी अकोला विमानतळ नसल्यात जमा आहे. या विमानतळाचा उपयोग केवळ काही विशिष्ट वेळीच होतो. इतर वेळी मात्र हे विमानतळ ओसाड असते.
सूचना : सर्व अमदारांचे फोटो घ्यावे
हिवाळी अधिवेशन स्पेशल.. विमान तळासाठी जिल्हयाच्या कारभा-यांनी करावा आवाज बुलंद
0
9
3
8
3
2
Users Today : 29
Leave a comment