मंठा येथील अनधिकृत पॅथालॉजीवरील कारवाईकडे आरोग्य विभागाचे जाणुनबुजून दुर्लक्ष.

Khozmaster
2 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा शहरामध्ये विनापरवाना, अवैधरित्या २० ते २५ रक्त तपासणी पॅथॉलॉजी गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत. याप्रकरणी काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील काही पॅथालॉजीची आरोग्य पथकाकडून तपासणीही करण्यात आली परंतु ठोस अशी कुठलीच कार्यवाही झालेली नाही.
गत काही वर्षांपासून मंठा शहरात सुरू असलेल्या २० ते २५ अनधिकृत पॅथालॉजी पैकी मागील पंधरवड्यामध्ये एका पॅथालॉजी धारकांना आरोग्य विभागाकडून नोटीसा देण्यात आली. दरम्यान आता पंधरा दिवसाचा कालावधी उलटूनही आरोग्य विभागाकडून कारवाई आणखी गुलदस्त्यात
आहे. याप्रकरणी उर्वरित पॅथालॉजी धारकांना आरोग्य विभागाकडून नोटीसा देण्यात येणार असल्याचे कळते. परंतु एका पॅथॉलॉजीची तपासणी करून काहीच ठोस ठोस कार्यवाही कार्यव करण्यात आली नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या कारवाईबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मंठा
शहरामध्ये विनापरवाना सुक्रू असलेल्या अवैध पॅथालॉजी धारकाकडून रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचा खेळ सुरू असून रुग्णांची आर्थिक पिळवणूकही संबंधित पॅथालॉजी धारकाकडून होत आहे. यामध्ये शहरातील काही बोगस डॉक्टरांचा देखील समावेश असल्याचे बोलल्या जाते बोगस डॉक्टरांनी आपले जाळे ग्रामीण भागात पसरवीलेले आहे. आरोग्य
संबंधित पॅथालॉजी धारक दुचाकीवर फिरून शहरातील प्रत्येक दवाखान्यातून रक्ताचे नमुने जमा करतांना दिसतात. यामध्ये काही अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. आरोग्या सारख्या महत्वाच्या बाबीमध्ये होत असलेल्या भोंगळ कारभारावर ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
विभागाकडून अवैध पॅथालॉजी धारकावर कार्यवाही करण्यासाठी बोटचेप्या धोरणाचा अवलंब करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. याप्रकरणी नोटीसा देऊनही पुढील कारवाई गुलदस्तात असल्याने विनापरवाना पॅथालॉजी धारकांचे चांगभले होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *