गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा तालुक्यात दि. 7 डिसेंबर ते 20 जानेवारी
या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रचे आयोजन करण्यात
आले असुन दिनांक 7 डिसेंबर रोजी पंचायत समिती मंठा येथे
गटविकास अधिकारी संतोष जाधव यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवुन
या संकल्प यात्रेस प्रारंभ करण्यात आला. या वेळी आरोग्य विस्तार
अधिकारी हरिभाऊ ताठे, विस्तार अधिकारी विजय पाटील,
बी.बी.चव्हाण, इक्बाल अन्सारी यांचे सह पंचायत समिती चे सर्व
कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती. शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील सर्व नागरिकांपर्यंत पोहचवीणे, पात्र लाभार्थीना विविध विभागांच्या शासकीय योजना चा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून पाठविण्यात आलेल्या मोबाइल व्हॅन द्वारे ही यात्रा सर्व गावांमधुन जाणार आहे व त्या दिवशी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थीत रहाणार आहेत. उपरोक्त कलावधीत दररोज दोन या प्रमाणे तालुक्यातील सर्व 92 ग्रामपंचायतींमध्ये या संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विस्तार अधिकारी हरिभाऊ ताठे यांनी दिली.
मंठा येथे विकसित भारत संकल्प यात्रेस प्रारंभ.
Leave a comment