खोपोली व रायगड पोलीसांची मोठी धडक कारवाई, १०७ कोटींचे एम. डी. ड्रग्ज केले जप्त, तीन आरोपींना घेतले ताब्यात….

Khozmaster
3 Min Read
बोरघर / माणगाव (विश्वास गायकवाड ) खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावचे हद्दीत इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी या नावाचा बोर्ड लावुन आतमध्ये मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याबाबत खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली. सदर गोपनीय माहीती ही वरीष्ठांना कळवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाईच्या अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना प्राप्त करुन उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापुर श्री. विक्रम कदम व खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शितल राऊत व खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी वरील नमुद कंपनीमध्ये कायदेशीर पद्धतीने छापा घातला.
दिनांक 07/12/2023 रोजी पोलीस पथकाने सदर ठिकाणी कंपनीत प्रवेश केल्यानंतर कंपनीचे चालक यांचेकडे सदर ठिकाणी रासायनिक पदार्थ निर्मिती करणेसाठी आवश्यक असणारा शासनाचा कोणताही वैध। परवाना मिळुन आला नाही. त्या ठिकाणी उग्र वास येत असल्याचे व काही कच्चा माल, तसेच त्याचेवर प्रक्रीया करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री असेंबल केल्याचे दिसुन आले. यामध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियमातील तरतुदीप्रमाणे कारवाई सुरु करण्यात आली. याबाबत तयार पक्का माल असलेली पावडर ही नार्को इन्स्पेक्शन कीट (Narco Inspection kit) द्वारे तपासणी केली असता सदर तयार केलेला माल हा एम. डी. म्हणजेच मेफेड्रॉन (Mephedrone) असल्याचे निष्पन्न झाले.
– कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल –
1) जप्त केलेला तयार मुद्देमाल –
रु.106 कोटी 50 लाख किंमतीची एकुण 85 किलो 200 ग्रॅम वजनाची एम. डी. पावडर
2) जप्त केलेला कच्चा मुद्देमाल –
रु.15,37,377/- किंतीची एम. डी. पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने
3) जप्त केलेला इतर मुद्देमाल
रु.65,00,000/- किंमतीची रासायनिक प्रक्रीयेसाठी असेंबल केलेली साधन सामग्री वरील सर्व मुद्देमालाची एकुण किंमत 107 कोटी 30 लाख 37 हजार 377 रुपये (अक्षरी रुपये एकशे सात कोटी तीस लाख सदतीस हजार तीनशे सत्याहत्तर मात्र) असुन सदर मुद्देमाल व मालमत्ता जप्त करुन सील करण्यात आलेली आहे. वरील प्रमाणे केलेल्या कारवाईमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन सदर बेकायदेशीर कंपनी देखील सील करण्यात आली आहे.
सदर कारवाई मा.श्री. प्रविण पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परीक्षेत्र, मा.श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, रायगड, मा. श्री. अतुल झेंडे, अपर पोलीस अधिक्षक, रायगड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापुर यांचे नेतृत्वाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शितल राऊत, सहा. पोलीस निरीक्षक श्री. हरेश काळसेकर, श्री. प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधाकर लहाने, श्री. अभिजीत व्हरांबळे, पोहवा 2072 राजेंद्र पाटील, पोहवा/2130 सागर शेवते, पोहवा /1086 प्रसाद पाटील, मपोहवा/५३ आर.एन. गायकवाड, पोना/2274 सतीष बांगर, पोना/1135 कुंभार, पोशि/566 आर.डी. चौगुले, पोशि/456 राम मासाळ, पोशि/1849 प्रदीप खरात असे सहभागी झालेले होते.
पोलीस पथकाने सतत 24 तास मेहनत करुन सदर कारवाई पूर्ण केली आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 364/2023 गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(c), 22 (c) सह कलम 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शितल राऊत हे करीत आहेत.
0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *