अ.नगर प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर
राज्यात अनुसूचित जातीमध्ये बहुसंख्येने असलेल्या मांग – गारुडी समाजातील १ हजार वंचित कुटुंबाला विनामूल्य मालकी हक्काची घरे मुंबई अथवा ठाण्यात देण्यात यावीत अथवा घरांसाठी किमान विनामूल्य १० एकर जमीन बहाल करण्यात यावी.अशी मागणी मांग गारुडी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच नेवासा तालुक्यातील देवगाव चे सुपुत्र अमर कसबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा वर्षानंतरही राज्य सरकारकडून मांग गारुडी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी मांग गारुडी समाजाची प्रगती अडथळे निर्माण झाले आहेत.
रोजगाराच्या अपुरी साधने आणि शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने मांग गारुडी समाज हा शहरातील रस्त्यावर पद पथावर उघड्यावर संसार थाटला आहे त्या समाजाच्या प्रगतीत प्रमुख अडथळा हा त्यांचा मालकी हक्काच्या घरांचा आहे. त्या मुळे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मुंबई अथवा ठाण्यात १ हजार मांग गारुडी समाजाच्या वंचित कुटुंबाला मालकी हक्काचे घरे विनामूल्य देण्यात यावे तसेच तसे शक्य नसल्यास राज्य सरकारने मुंबई अथवा ठाणे शहरात १० एकर जमीन राज्य सरकारने मांग गारुडी समाजाच्या नावे बहाल करावी अशी मागणी ही मांग गारुडी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमर कसबे यांनी केली आहे.
मांग गारुडी समाजाच्या मालकी हक्क विनामूल्य घरांसाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती ही अमर कसबे यांनी दिली आहे.समाजाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्रक देण्यात आल्याचे कसबे यांनी सांगितले.
मांग गारुडी समाजाला मुंबईत मालकी हक्काची १हजार घरे द्यावीत :- अमर कसबे यांची राज्य सरकारकडे मागणी
Leave a comment