समग्र बाबासाहेब वाचन मनन शिबीर संपन्न.

Khozmaster
1 Min Read
बुलढाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह
डॉ.बी.आर.आंबेडकर संपूर्ण मानव जातीच्या उत्थानाचे युग प्रवर्तक आहे. अस्पृश्यता आणि समानता यातील दरी मिटविण्यासाठी जीवन समर्पित करनारे बाबासाहेब बहुजनांचे कैवारी ठरले. असे मनोगत सुरेखाताई निकाळजे यांनी व्यक्त केले.
स्थानिक रमाई ब्रिगेड,वारी आपल्या दारी अभियान,आझाद हिंद शेतकरी संघटना, बहुजन महिला संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने महामानव डॉ. बी.आर.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तीन दिवसीय समग्र बाबासाहेब वाचन मनन शिबिराचे आयोजन आझाद हिंदच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले होते. आठ डिसेंबरला दुपारी समारोपीय सत्रात मनोगत व्यक्त करतांना आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजेंनी बाबासाहेबांना उपरोक्त विचारांची आदरांजली समर्पित केली. यावेळी प्रबोधनकार ॲड.सतीशचंद्र रोठे,सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भाकडे,अतूल सोनूने,पंचफुलाताई गवई,आशाताई गायकवाड,विशाल राणे,सौ.योगीता रोठे,शाहीर सिंधुताई अहेर आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरामध्ये दैनंदिन दु.बारा ते चार दरम्यान तीन तास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तकांचे वाचन मनन करण्यात आले. सामूहिक अभिवादन व राष्ट्रगीताने तीन दिवशीय समग्र बाबासाहेब वाचन मनन शिबिराचा समारोप करण्यात आला.
शिबिरात शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पुरुष व फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर कार्य करणाऱ्या असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वयंस्फृतीने सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी आझाद हिंद संघटना, झाशी ब्रिगेड, बहुजन महिला संघटना, रमाई ब्रिगेड, किसान ब्रिगेड, देशगौरव सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती, आयोजक संघटनाच्या प्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *