तळवडे एमआयडीसीमध्ये मोठी दुर्घटना,फटाक्याच्या कंपनीत आग लागून ७ जणांचा मृत्यू

Khozmaster
1 Min Read

पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील तळवडे परिसरात असणाऱ्या एका फटका गोदामाला आग लागून ७ जण मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये सर्व महिलांचा समावेश आहे.

अग्निशामक दलाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. हे फटाका गोदाम विना परवाना सूरू असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.अग्निशामक दलाकडून आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अधिक माहिती घेण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरु आहे.हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, असेही म्हटले जात आहे. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *