मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णय होत नसल्यानं नैराश्य, हिंगोलीच्या युवकाचं टोकाचं पाऊल, संपूर्ण गावात हळहळ

Khozmaster
2 Min Read

हिंगोली: मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतानाच हिंगोलीच्या खंडाळा येथील मराठा युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मराठा आरक्षणासाठी हिंगोली मध्ये दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली होती. या सभेच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आत्महत्या करू नका, निराश होऊन जाऊ नका तुम्ही आत्महत्या केल्यावर हे आरक्षण कोणासाठी घ्यायचे आणि याचा कोणाला फायदा घ्यायचा म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका, असं आवाहन केलं होतं.

मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला दोन दिवस उलटत असतानाच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीच्या मौजे खंडाळा येथील सव्वीस वर्षीय विठ्ठल दतराव गायकवाड या युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
विठ्ठल गायकवाडनं आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना गावामध्ये कळताच एकच खळबळ उडाली आहे. मृत विठ्ठल हा मराठा आरक्षणाच्या लढ्यात नेहमी सक्रिय असल्याची माहिती मिळतांच्या नातेवाईकांनी दिली.विठ्ठल गायकवाड यानं हिंगोली येथील झालेल्या विराट सभेत सहभाग घेतला होता. स्वयंसेवकाची जबाबदारी देखील त्यानं सभेदरम्यान पार पाडली होती.पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊनही नोकरी नसल्यानं आणि आरक्षणाचा तिढा सुटला नसल्यानं परिणामी नैराशजन्य जीवन जगाव लागत असल्यानं विठ्ठल यांनं टोकाचं पाऊल उचलले. ही घटना ग्रामीण पोलिसांना कळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. आम्ले यांच्या पोलीस पथकानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. हिंगोली जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी विठ्ठल गायकवाड याचा मृतदेह नेला आहे . मृत विठ्ठल याला एक मोठा भाऊ देखील आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 6 6 8 3 9
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18:25