घरी एकटी राहणार नाही म्हणून लेकीने फोडला हंबरडा, आईने विश्वासात घेऊन विचारताच हादरली…

Khozmaster
2 Min Read

जालना : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. सध्या महिला कुठेही सुरक्षित नाही, हेच सत्य आहे. अशात जालन्यामध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं बापानेच पोटच्या १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द बाल लैंगिक अत्याचार व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई-वडिलांसह शहरातील एका भागात राहते. दिवाळीच्या ४ ते ५ दिवस अगोदर पीडितेची आई किराणा सामान घेण्यासाठी बाजारात गेली होती. सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास तिचा बाप हा कॉटवर झोपला होता. तर पीडित अल्पवयीन मुलगी ही खाली झोपली होती. त्याचवेळी नराधम बापाने तिचा विनयभंग केला. यानंतर हा प्रकार कुणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली.दरम्यान, सोमवारी सायंकाळी पीडित मुलगी मी घरी एकटी राहणार नाही, असं म्हणत रडू लागली. आईने तिला विश्वासात घेऊन विचारलं असता मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर घरातील एका ज्येष्ठला याबाबत माहिती देण्यात आली. आईने पीडित मुलीला सोबत घेऊन तालुका ठाणे गाठले. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून बापाविरुध्द कलम ३५४, ५०६, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली असून उपनिरीक्षक भताने पुढील अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *