आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्या करिता मोर्चात शामिल व्हा – के.जी.शाह ईशारा मोर्चा निमित्त रायपूर येथे आढावा बैठक संपन्न

Khozmaster
2 Min Read
बुलढाणा : (खोज मास्टर ) अकील शाह बुलडाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी
आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्या करिता मोठ्या संख्येने ईशारा मोर्चात शामिल व्हा असे प्रतिपादन मुस्लीम शाह फकीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह यांनी रायपूर सैलानी येथे आयोजीत केलेल्या समाजाच्या बैठकीत उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना केले आहे. राज्यातील मुस्लीम शाह फकीर जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात राज्य शासनाने करावा या मागणीसाठी मुस्लीम शाह फकीर संघटनेच्या वतीने दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे विधान भवनावर इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यां कडुन मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात आढावा बैठक घेऊन शाह समाजाने मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
                आढावा बैठकीला संस्थापक महासचिव जाकीर शाह, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लुकमान शाह, विदर्भ अध्यक्ष युवा आघाडी अकील शाह, युवा आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीद शाह यांच्या सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीला संस्थापक महासचिव जाकीर शाह, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लुकमान शाह, विदर्भ अध्यक्ष युवा आघाडी अकील शाह, युवा आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीद शाह यांनी मार्गदर्शन करत मुस्लीम शाह फकीर जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात राज्य शासनाने करावा या मागणीसाठी विधिमंडळा वर काढण्यात येत असलेल्या ईशारा मोर्चात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन विविध पदावर यांची नियुक्ती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. सदरच्या मोर्चाला यशवंत स्टेडियम येथून दुपारी 12.00 वाजता मोर्चा आंदोलनास सुरुवात होणार आहे.
           सदरच्या आढावा बैठकीला अंसार शाह, ताहेर शाह, गफ्फार शाह, इस्माइल शाह, साबिर शाह, कादर शाह, रईस शाह आसिफ शाह, आरिफ शाह, मुजम्मिल शाह, इमरान शाह आकील शाह, महेबुब शाह, सिद्दिक शाह, अहमद शाह, उमर फारूक शाह, इरफान शाह, अनीस शाह दगडू शाह, यूनुस शाह, अजीम शाह, सोहिल शाह वसीम शाह कलीम शाह मुकीम शाह अतहर हुसैन शाह, रईस शाह सईद शाह, हामिद बाबा सैलानी, सलीम शाह बाबा सैलानी, आसिफ शाह, नुमान शाह, मुस्तकीम शाह यांच्या सह रायपुर, सैलानी, पिंपळगाव सराई सह परिसरातील शाह समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
0 9 3 8 3 5
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *