पहूर, ता.जामनेर येथे आयशरच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पावणे आठ वाजेच्या दरम्यान घडली.
पहूर येथील शिक्षक तथा पत्रकार शंकर भामरे सायकलने मुलगी ज्ञानेश्वरी भामेरे हिच्यासह
बस स्टॅन्ड वर येत असतांना
पाठीमागून मागून येणाऱ्या
आयशर क्रमांक एम. एच. २३ ऐ.यु ५५८२ या गाडीने जोरदार धडक दिली त्यात शंकर भामरे व मुलगी ज्ञानेश्वरी रस्त्यावर फेकले गेले यात सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वय (११ ) हिचा जागीच मृत्यू आयशरच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर शंकर भामेरे हे जखमी झाले.नेमकीच कु.ज्ञानेश्वरी शंकर भामेरे यामुलीची बाल शिवबा हि कविता दि.६/१२/२३ बुधवार रोजी दैनिक अजिंक्य केसरीरा छापून आली होती.ज्ञानेश्वरी ही आज जळगाव येथे स्वतः लिहिलेल्या कविता सादर करण्यासाठी कवी संमेलनाला जात होती. तीला सोडण्यासाठी वडील शंकर भामरे बस स्थानकावर येत असतानाच हा अपघात झाला. दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरी भामरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आयशर चालक सुनिल ग्यानदेव सोनवणे राहणार अंजनवटी तालुका जिल्हा बीड यास पहूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बसस्थानक परिसरात रास्ता रोको सध्या सर्वत्र रस्त्याचे काम सुरू असून काम अपूर्ण अवस्थेत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे . त्याचाच बळी ज्ञानेश्वरी भामेरे बालकवी ठरली आहे जळगाव – संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या वाघूर नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर असून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा भयंकर त्रास होत आहे. या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघातही दररोज होत आहे या रस्त्याचे काम त्वरित व्हावे यासाठी या मुलीचे अंत्यसंस्कार आटोपताच पहूर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी व नागरिकांनी पहर बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी माजी जि.प सदस्य राजधर पांढरे, माजी जि.प कृषी सभापती प्रदीप लोढा, रामेश्वर पाटील, महेश पाटील, आदींनी संतप्त भावना व्यक्त करून पहूर पेठ व पहूर कसबे या दोन्ही गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन हायवे ओलांडून गावात जावे लागत आहे व बस स्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी ही यावेळी रास्ता रोको आंदोलनावेळी करण्यात आली. रस्त्याचे काम त्वरित करावे दरम्यान रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तसेच आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
Users Today : 23