चिखली:-आजच्या या स्वार्थी युगामध्ये त्यागाचे प्रतीक असलेल्या खासदार सोनिया गांधी यांनी युपीए सरकार असताना ठरवलं असतं तर दोन वेळेस पंतप्रधान झाल्या असत्या,पण अक्षरशा स्वतः त्या पदाचा त्याग करून भारत देशाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या विचारातून अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून,आपल्या शांत संयमी स्वभावाने पंतप्रधान पदापासून दूर राहून भारत देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्याचे काम सोनिया गांधी यांनी केले, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडिया अमरावती विभागाचे समन्वयक ज्ञानेश्वर पचांगे यांनी व्यक्त केले. आज सोनिया गांधी यांच्या वाढदिवसा निमित्ताने चिखली तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या मेडशिंगा या अतिदुर्गम गावात गोरगरीब निराधार महिलांना साड्या तर गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले .
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसा निमित्ताने चिखली तालुक्यातील शेवटचे अतिदुर्गम असलेल्या मेडसिंगा या छोट्याशा गावामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर गोरगरीब निराधार महिलांना साड्यांचे वाटप ज्ञानेश्वर पचांगे याच्या वतीने आणि जिल्हा कॉग्रेसचे कमिटचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शना खाली व समाधान सुपेकर चिखली तालुका कॉग्रेस कमेटी अध्यक्ष यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, समाधान सुपेकर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असतांना गरीबातला गरीब व शेवटचा निराधार माणसाला आपण आधार देण्याची या काळामध्ये गरज आहे, म्हणून नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाला कुठेही बॅनरबाजी न करता, पोस्टरबाजी न करता, व्यर्थ पैसा खर्च न करता,आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या गावांमध्ये जाऊन आपण विद्यार्थ्याला पुस्तक दिले, निराधारांना गरिब माता भगीनीना साड्यांचे वाटप करुन आधार दिला, अपंगांना निराधार योजनेची माहिती असे अनेक सामाजीक कार्य ज्ञानेश्वर पचांगे हे नेहमी करतात असे म्हटले आहे.
यावेळी शे. इरफान कॉग्रेस सेवा दलाचे तालुका सचिव, तालुका युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष रुपेश घोलप, शाम राठोड, पजांब वानखेडे, भगवानराव शेजुळ, शामराव वानखेडे, भिमराव शेजुळ ,मदन राठोड,सुनील शेजुळ हे प्रमुख उपस्थितीत होते.
Users Today : 33