छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी -:— शेंदूर्णी येथे बाप- लेकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना येथे घडली असून शेतीच्या वादाच्या वादातून मुलानेच बापाच्या डोक्यात लोखंडी फावडे मारून बापाला यमसदनी पाठविल्याने शेंदूर्णी सह परिसर हादरला आहे. सविस्तर वृत्त असे की, येथिल तरंगवाडी शिवारात वाटणीच्या वादातुन मुलाने बापाच्या डोक्यात पावडे घालुन यमसदनी पाठविल्याची धक्कादायक घटना घडली असून आरोपी मुलगा फरार असून आरोपीच्या मुलाने बापा विरोधात फिर्याद दिली आहे.सविस्तर वृत्त असे की, येथिल शेतकरी मयत नाना बडगुजर (वय ८२ वर्ष) हे सकाळच्या सुमारास शेतात कपाशी वेचत होते. सुमारे नऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा नामे कैलास नाना बडगुजर (वय ५६ वर्षे) हा शेतात आला आणि वडीलांसोबत वाटणी वरून वाद घालू लागला. याप्रसंगी त्यांच्यात शाब्दीक वाद झाला आणि आरोपी कैलास याने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या फावडयाने डोक्यात जोरात वार करताच नाना बडगुजर हे जागेवरच कोसळले. येथेच त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, ही घटना घडली तेव्हा आरोपीचा मुलगा विशाल आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. विशाल याने वडिलांनी आजोबाच्या डोक्यात वार केल्याचे बघताच धाव घेतली. त्याने वडीलांच्या हातुन फावडे हिसकावून जखमी आजोबांना सावरण्याचा प्रयत्न केला. ते कोणतीही हालचाल करीत नसल्याचे बघुन आरोपी याने शेतांमधुन पळ काढला.
आणि संबधीत घटनेची माहिती वा शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी घटन पोलीसांना खबर दिली. या संदर्भात, शेंदुर्णी दुरक्षेत्रचे
आणि संबधीत घटनेची माहिती वाऱ्या सारखी इतर शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेत पोलीसांना खबर दिली. या संदर्भात, शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, शशिकांत पाटील पोकाँ. प्रशांत विरनारे, शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मयत यांना पहुर ग्रामिण रुग्णालयात हलविले आणि घटना स्थळाचा पंचनामा करीत साहित्य ताब्यात घेतले. दिवसभर आरोपी मुलगा कैलास बडगुजर याचा शोध सुरु असुन पथके रवाना करण्यात आली आहेत.सदर घटनेची फिर्याद आरोपीचा मुलगा विशाल कैलास बडगुजर वय ३३ याने दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम ३०२ नुसार गुरं ४९१ / ३०२ नुसार पहुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप सानप यांच्या मार्गदर्शना खाली पीएसआय दिलीप पाटील करीत आहेत
Users Today : 23