सोयगाव तालुक्यात अवकाळी पाऊस साथ सोडेना;सरकार हमी भाव देईना! यंदाही आठवडी बाजारात पांढराऱ्या सोन्याची कवडीमोल भावाने खरेदी

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात शेतकऱ्यांच्या हक्काचे पिक म्हणून ओळख असलेले पांढरे सोने पिक आता शेतकऱ्यांना नकोसे वाटत आहे. यंदाही आठवडी बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी होत आहे.सरकार हमी भाव देईना, निसर्ग साथ देईना, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या  आर्थिक संकटात सापडला आहे मागील वर्षांपासून कापसाला योग्य भाव मिळत नाहीं. त्यामुळे यंदा कापूस उत्पादनातही मोठी घट झाल्याने शेतकन्यांचा उत्पादनावर होणार खर्चही भरून निघत नाही सावळदबारा,देवळगांव गुजरी व फत्तेपूर येथील आठवडी बाजारात कापसाला चार ते पाच हजार अशा कवडी मोल भावाने कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच निसंगही शेतकऱ्यांच्या हात धुवून पाठीशी लागला आहे. यावर्षी शेतकऱ्यासमोर एकामागुन एक संकटाची मालीका सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी शेतमजुर पूर्णपणे हतबल झाले आहे. शेतकऱ्यांना कापसाच्या उत्पादनातुन आजपर्यंतचा खर्चही काढता आला नाही.यंदा कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी महागडी बियाणे घेऊन कापसाची लागवड केली होती. कापसाच्या लागवडीपासून ते आजपर्यंत शेतकऱ्यांनी निंदाई, कोळपणी, औषधी फवारणी खते व बियाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. मात्र कापसाची कवडीमोल भावाने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडून गेले आहे. सध्या महागाईचा चढता आलेक पाहता कापसाला दहा ते बारा हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु याकडे लक्ष घालायला सरकारला वेळच मिळत नाही. संध्या शेतकरी, शेतमजुर आर्थिक संकटात सापडला आहे तर दुसरीकडे उत्पादनात मोठी घट झाली आहे. या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. तर एकिकडे निर्सग तर दुसरीकडे सरकार अशा अडचणीत शेतकरी राजा सापडला आहे.
0 9 3 8 3 6
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *