छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर/छत्रपती संभाजीनगरऔरंगाबाद
कवी वामनदादा कर्डक -अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ व कै, पुंजाजी बाबा प्रतिष्ठान व लोककला विकास मंच यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथील मौ, अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात राज्यातील विविध क्षेत्रातील कलावंताचा भव्य महोत्सव संपन्न झाला ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ,कल्याण काळे ,व प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्रतील प्रसिद्ध गायिका
कडूबाई खरात यांची प्रमुख उपस्थिती होती,प्रथम टी, व्ही,सेंटर येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले व पारंपरिक वाद्य च्या तालात, सुरात कलावंत मंडळी अब्दुल कलाम हॉल कडे निघाली या कलाकारांच्या फेरीत नंदीबैल व संत गाडगेबाबा च्या वेषातील वैजापूर चे धोंडीरामसिंह राजपूत ,चार्ली चॅप्लिन च्या भूमिकेत श्री पंडित यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते,बैलाचे नृत्य,पारंपरिक वेषातील कलाकार वाद्य च्या तालावर नाचत होते, आयोजक एकनाथ शेठ त्रिभुवन,स,सो,खंडाळकर,या
शाहीर अशोक बागुलवेळ किरणसिंह राजपूत, यांनी या फेरीत सक्रिय सहभाग घेतला,हॉल मध्ये प्रत्येक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली, कडुबाई खरात ,यांनी गीते सादर केली,चार्ली ने कोरोना काळातील गीत सादर करून त्या काळातील विदारक स्थिती सादर केली,धोंडीराम राजपूत यांनी गोपाला, गोपाला ,देवकीनंदन गोपाला हे गाडगेबाबांचे गीत सादर करून स्वच्छतेचे महत्व विशद केले, हा सहा तास विविध गीते,कला च्या विविध कार्यक्रमाने सहा तास चालला, या कला महोत्सवात मान्यवर ।मंडळी सहभागी झाली होती,या महोत्सवात कलाकार मानधन वाढवून मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असल्याचे श्री काळे यांनी सांगितले
Users Today : 33