एजाज खान. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिंदु-मुस्लिम् ऐक्याचे प्रतिक असलेल्या हजरत पीर पहाडी सरकार यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 08 डिसेंबर 2023 रोजी कुल हिंद मुशायरा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.त्याचप्रमाणे दिनांक 09/12/2023 रोजी कोल्हापूर येथील लेडीज कव्वाला छोटी शबनम आणि आपल्या मेहकर शहरातील स्थानिक कव्वाल आजाद अली चिश्ति यांच्यात जोरदार कव्वालीचा मुकाबला संपन्न झाला या ही कार्यक्रमाला प्रेक्षकांची फार मोठया प्रमाणात उपस्थिती होती.या मुकाबला कार्यक्रम मध्ये चांगल्या प्रकारच्या कव्वाल्या म्हणण्यात आल्या तसेच देशभक्तीपर सुद्धा कव्वाली गायिल्या गेल्या .सायंकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यन्त सुरु असलेल्या या कव्वाली च्या कार्यक्रमाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.या कार्यक्रमाला जितकी उपस्थिती सर्वधर्म पुरुषांची होती त्याहीपेक्षा जास्त महिलांची उपस्थिती होती. मेहकर नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांच्या नेतृत्वात दरवर्षी ही यात्रा भरत असते. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने महिला व पुरुषांची तसेच विशेष निमंत्रित म्हणून शिवसेना उ.बा.ठा. चे उपाध्यक्ष आशिष राहाटे,तालुका उपाध्यक्ष निंबाजी पांडव, शहर अध्यक्ष किशोर गारोळे, तसेच खंडाळा चे सरपंच रतन पाटील मानघाले आणि आकाश दादा घोडे यांची तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी ,प्रदेश प्रतिनिधी,सांस्कृतिक सेल, माजी नगराध्यक्ष, नगर सेवक, सेवा दल, एन .एस. यु.आय,अल्पसंख्यांक सेल, युवक काँग्रेस चे सर्व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नेते कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र माने तसेच मो.शकूर यांनी केले
Users Today : 33