लोणावळा, पुणे : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी मध्यरात्री दोन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाले आहे. दुधाच्या टँकरने एका गाडीला जोरात धडक दिल्याने अपघात झाला त्यात टँकर चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. टँकरचालकाला स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. तर दुसऱ्या अपघातात खाजगी बसने अज्ञात वाहनाला धडक दिल्याने अपघात झाला आहे. याअपघातातही बस चालकाचा जागेवर मृत्यू झाला.
दोन्ही अपघात थोड्या फार फरकाने झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याने मदत मिळण्यास थोडा विलंब झाला. मात्र, बचाव पथकांनी बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. काही जखमींना एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात असून या अपघातामुळे मुंबई पुणे लेनवर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त बस बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
Users Today : 23