करोनात पतीला गमावलं, दोन वर्षांनंतरही दु:ख कमी होईना, अखेर… ८ वर्षांची चिमुकली अनाथ झाली

Khozmaster
1 Min Read

नागपूर: पतीच्या निधनाने तणावात असलेल्या ३८ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. ही हृदयद्रावक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळगीनगर येथील साई रिजन्सी अपार्टमेंट येथे घडली. सोनाली अजय खर्चे असे मृत महिलेचे नाव आहे. त्या खासगी बँकेत कार्यरत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी करोनामुळे अजय यांचे निधन झाले. त्या मुलगी आराध्यासोबत (वय ८) राहायच्या. सोनाली यांचे वडील राजेंद्र जाधव हे सन्माननगर येथे राहायच्या. कामावर जाताना सोनाली या आराध्याला वडिलांकडे ठेवायच्या. शुक्रवारी त्यांनी आराध्याला वडिलांकडे सोडले. सायंकाळी आराध्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली. ती राजेंद्र यांच्याकडेच थांबली.

शनिवारी सोनाली या मुलीला घ्यायला घरी आल्या नाहीत. त्यामुळे राजेंद्र यांनी सोनाली यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. संपर्क झाला नाही. सायंकाळी राजेंद्र हे सोनाली यांच्या घरी गेले. आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले असता सोनाली या रबरी पाइपने पंख्याला गळफास घेतलेल्या दिसल्या. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. आई-वडिलाच्या मृत्यनेू आराध्याचे छत्र हरपले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *