कागल : ‘समरजितसिंह आपल्या दारी’ आभियानमध्ये शासकीय योजनांच्या मंजुरी पत्राचे वाटप करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे.
…
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील
समाधान हीच मोठी उर्जा
समरजितसिंह घाटगेः लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटपकागल, ता. १० : शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याला थेट नेत्याच्या दारात किंवा एजंटाच्या दारात उभे राहावे लागत असे. ‘समरजितसिंह आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ही पद्धत आम्ही मोडीत काढली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या दारापर्यंत जाऊन आम्ही देत आहोत. कागलमध्ये यापूर्वी असे कधीच घडले नाही. यानिमित्ताने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमच्या लोककल्याणकारी कामांसाठी उर्जा आहे,’असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथील महात्मा फुले वसाहतीत विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त राजे फौंडेशन व राजमाता जिजाऊ समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला संकल्प करुया, ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ देऊया’ उपक्रमांतर्गत ‘समरजितसिंह आपल्या दारी’ अभियान अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांच्या वाटपवेळी ते बोलत होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना थेट घरी जाऊन घाटगे यांनी मंजुरी पत्रांचे वाटप केले.
घाटगे म्हणाले, ‘शासकीय योजनांचा लाभ देताना विरोधकांनी गटतट बघून काम केले. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले आहेत. अशा लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचून त्यांना लाभ देत आहोत. विशेष म्हणजे आमचे कार्यकर्ते शासकीय योजनेचे लाभ कोणताही दबाव न आणता लाभार्थ्यांच्याकडून एकही रुपया न घेता मिळवून देत आहेत. आमचे युवा कार्यकर्ते या विधायक कार्यात गुंतले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे.’ याप्रसंगी त्रिशला सोनुले, धीरज घाटगे, अक्षय घस्ते यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मी सावंत, उषा सोनुले, शाहू कारखान्याचे संचालक यशवंत माने, सतीश पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव, उमेश सावंत, अरुण गुरव आदी उपस्थित होते. स्वागत शुभम सोनुले यांनी केले.आभार सुरेश पिष्टे यांनी मानले.
Users Today : 2