गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा तालुक्यातील हेलस : येथील संतप्त ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाला ठोकले कुलूप.रोहरंत्रे जळाल्यामुळे वीस दिवसापासून हेलस अंधारात.९० टक्के वसुली देऊन गाव अंधारात असल्यामुळे हेलस येथील ग्रामस्थांनी ही बाब मंठ्याचे माजी नगराध्यक्ष कैलास बोराडे यांना सांगितले कैलास बोराडेसह ग्रामस्थ वीज वितरण महा कंपनीच्या कार्यालयात गेले असता दुपारी एक वाजता कार्यालयात एकही कर्मचारी हजर नसल्यामुळे कैलास बोराडे व ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.
याविषयी सविस्तर माहिती अशी की हेलस येथील ग्रामस्थांनी गावातील रोहयंत्रे जळले असून गाव अंधारात असल्यामुळे वीज महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना दहा ते बारा दिवसाखाली निवेदन दिले होते निवेदनात असे म्हटले होते की हेलस येथील विद्युत पुरवठा अनेक दिवसापासून खंडीत आहे. या बाबत आपणास यापुर्वी अनेक वेळा ग्रा.पं.च्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने अर्ज देण्यात आले होते परंतू अद्यापही आपल्या कार्यालयाकडून उचित कार्यवाही झालेली नाही.
आज रोजी गावात केबलचे काम अर्धवट करण्यात आले आहे ट्रांसफार्मर जळालेले आहे आणि एका नविन रोहरंत्रे स्ट्रक्वर सहा महिन्यापासून उभे केले आहे परंतू त्यावर रोहरंत्रे बसविली नाही.या बाबत आपणास वारंवार अर्ज दिले असून देखील आपण उचित कार्यवाही केलेली नाही अनेक दिवसांपासून गाव अंधारात आहे.
या प्रकरणी आठ दिवसाच्या आत उचित कार्यवाही केली नाही तर आपल्या कार्यालया समोर समस्त गावकऱ्या समक्ष येवून आपले कार्यालयीन कामकाज बंद करण्यात येईल. व कुलूप ठोकण्यात येईल असे निवेदन देण्यात आले होते मात्र कोणतीही रोहरंत्रे बसविण्यासाठी कारवाई न झाल्याने संतप्त गावकरी व माजी नगराध्यक्ष कैलास बापू बोराडे,
नामदेव बनसोडे ,भगवान खराबे, बाळासाहेब खराबे, विलास खराबे, नागेश साखरे, अशोक भोगवकर, नागेश भोगावकर, कृष्णा खोडके, संजय
संतोष वाघमारे, विठ्ठल खराबे,
यांनी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाला आज कुलूप ठोकले