रस्ता ओलांडताना अनर्थ, भरधाव वाहनाने दोघांना चिरडलं, जिवलगांचा जागीच करुण अंत

Khozmaster
1 Min Read

पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव वाखारी गावच्या हद्दीतील आयसी कंपनीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या दोन पादचाऱ्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास केडगाव (वाखारी) गावच्या हद्दीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आयसी कंपनीसमोर सोलापूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कैलास दत्तात्रय शेळके (वय ५८) व पांडुरंग दत्तात्रय शेळके (वय ५६, दोघेही रा. देशमुख मळा, केडगाव ,ता. दौंड, जि. पुणे) या दोघांना जोरदार धडक दिल्याने गंभीर दुखापत होऊन दोघांचाही मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेबाबत राजेंद्र जयसिंग शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बावकर हे करीत आहेत.

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *