सोलापूर: शहरात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या वाहनासमोर चप्पल फेक करण्यात आली आहे. या प्रकरणी राणे समर्थक सागर शिंदे या तरुणाने संजय राउत यांच्या वाहनावर संताप व्यक्त करत चप्पल फेकल्याची कबुली दिली आहे. आपल्याला पुलावर चपल्या मिळाल्या म्हणून चप्पल फेकली. अन्यथा दगड मिळाले असते तर संजय राऊत यांचं डोकं फुटलेलं दिसलं उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे वारंवार नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणतात. त्यामुळे मी चप्पल फेक केली. मराठा समाजाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणाल्याचा राग अनावर झाला होता. हा राग आपल्या मनात होता आणि त्यातून आपण हे कृत्य केल्याचे त्याने कबूल केलं आहे.असतं, असे त्याने सांगितले आहे.उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या वाहनावर सोलापुरात चप्पल फेक केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. यामुळे सोलापुरातील शिवसैनिक तीव्र शब्दात संताप व्यक्त करत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी संताप व्यक्त करत राणे समर्थकांना इशारा दिला आहे. नितेश राणे समर्थकांनीच चप्पल फेकीसारखा प्रकार केल्याचा आरोप शरद कोळी यांनी केला आहे. मर्द असले असते तर थांबले असते. शिवसैनिकांनी त्याच ठिकाणी तुडवले असते, असा इशारा देखील शरद कोळी यांनी दिला आहे.