नागपूर : कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटणकर चौकातील शासकीय मुलांच्या बालगृहात मोबाइलद्वारे चित्रीकरण करून पाच मुलांनी १२ व १६ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोबाइलचा शोध सुरू केला आहे. बालगृहातील मुलांपर्यंत मोबाइल पोहोचविला कोणी, असा प्रश्न उपस्थित होत असून, बालगृहातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा हा कळस असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही अनेकदा हे बालगृह चर्चेत आले आहे. या घटनेने बालगृह अधिकारी व पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, हे बालगृह आहे की अत्याचारगृह, असा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पीडित १६वर्षीय मुलाच्या वडिलाचे निधन झाले. शासकीय नोकरीवर असताना त्याच्या आईचाही मृत्यू झाला. संपत्तीचे वाटेकरी जमले. ते मुलाचा छळ करायला लागले. याचदरम्यान एकाने अनाथ झालेल्या मुलाला बालगृहात पाठविले. येथेही त्याचे जगणे कठीण झाले. येथील मुलांनीच त्याची शारीरिक पिळवणूक केली. १२वर्षीय मुलगा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याची आई सोडून गेल्यानंतर वडिलाला दारूचे व्यसन जडले. त्याच्या वडिलाने घरी येणे बंद केले. निराधारासारखे जगू लागल्याने एका नागरिकाने त्याला समितीच्या माध्यमातून बालगृहात पाठविले.
Users Today : 23