Nagpur Accident News: कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विटाभट्टी परिसरातील झोपडीत ट्रक शिरल्यानेच चौघे जखमी झाले. ही घटना रविवारी (ता.१०) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
खुमानसिंग श्यामलाल मेश्राम वय ४०, त्यांच्या पत्नी शामकली वय ३५, मुलगा तिलक व मुलगी संध्या, अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुमानसिंग व त्यांच्या पत्नी शामकली कोराडीतील कमल इमले यांच्या विटभट्टीत काम करतात. येथेच खुमानसिंग व त्यांचे कुटुंब झोपडीत राहते.रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शामकली या स्वयंपाक करीत होत्या. बाजूलाच तिघेही बसले होते. याच दरम्यान ट्रक झोपडीत घुसला. चौघेही जखमी झाले. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला. परिसरातील नागरिकांनी चौघांनाही मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिलक हा किरेकाळ जखमी असून, अन्य तिघांचा मेयोत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोराडी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू केला आहे.
Users Today : 23