सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत.
सोयगाव शहराचे सोयगाव पोलिस ठाण्याअंतर्गत सहाय्यक पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मागील तीन महिन्यात केलेली काम पोलीस दलाच्या कामगिरी मध्ये सुधारणा होवुन लोकांना पोलीस दलाकडून चांगल्यातली चांगली तत्पर सेवा देण्यासाठी तसेच लोकांची पोलीसांची प्रतिमा उंचवण्यासाठी तसेच स्पर्धेतुन चांगली कामगिरी घडण्यासाठी देश पातळी व राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ठ सोयगाव पोलीस स्टेशनची प्रत्येक वर्षी निवड केली जाते. त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक श्री. मनिष कलवानिया साहेब, यांनी तीन महिन्यातील चांगल्या कामगीरीसाठी पोलीस स्टेशनची स्पर्धा घेवुन त्यात निवडल्या जाणा-या पोलीस स्टेशनला प्रशंसापत्र व ट्रॉफी दिल्या जाते. या निवडीच्या निकषामध्ये पोलीस स्टेशनची गुन्हे निर्गती, मुद्देमाल निर्गती, न्यायालयात चालु असलेल्या प्रकरणामध्ये शिक्षेचे प्रमाण, पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध, अवैध धंद्यावरील कार्यवाही, गुन्हातील आरोपीतांवर केलेली प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण, गुन्हातील जप्त मुद्देमालाचे प्रमाण समन्स-वारंटचे तामीलीचे प्रमाण, सीसीटीएनस प्रणाली चे गुन्हे भरण्याचे प्रमाण, हरवलेल्या व्यक्तींचा शोध अशा सर्व प्रकारच्या कामगिरीचा आढावा घेवुन त्यामध्ये गुणांची बेरीज छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हातील २३ पोलीस स्टेशन पैकी ज्या पोलीस स्टेशनचे गुण सर्वात जास्त येतात त्या पोलीस स्टेशनची निवड सर्वोत्कृष्ठ पोलीस स्टेशन म्हणून केली जाते. तसेच प्रत्येक घटकावर चांगली कामगिरी करणा-याची सुध्दा निवड केली जाते त्या घटकातील सर्वोत्कृष्ठ दोषसिध्दी मध्ये (न्यायालयात चालु असलेल्या प्रकरणामध्ये शिक्षेचे प्रमाण) सुध्दा पोलीस स्टेशन सोयगावची निवड झाली आहे. या सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे, सर्वोत्कृष्ठ दोषसिध्दी पारितोषिकासाठी सोयगाव पोलीस ठाणे येथील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत घेतली आहे.आज माहे डिसेंबरच्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री मनीष कलवानिया साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री सुनिल लांजेवावर साहेब, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी सर्वोत्कृष्ठ पोलीस स्टेशनसाठी पोलीस ठाणे सोयगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांना प्रशंसापत्र व ट्रॉफी देवून सन्माणीत केले. तसेच दोषसिध्दी मध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरीसाठी पोलीस ठाणे सोयगाव येथील कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक फौ.विलास पवार,पोलीस अंमलदार रवींद्र तायडे,अजय कोळी, संजय सिंगल, गजानन दांडगे यांना प्रशंसापत्र व ट्रॉफी देवून सन्मानित केले. यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.