जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर, ता. जामनेर, दि.१०
जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी च्या खेळाडूंनी १५ पदकांची कमाई करुन पहूर च्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला.
आज दिनांक ११/१२/२०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे तायक्वांडो स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत पहूर येथील शौर्य स्पोर्टस् अकॅडमी च्या १५ खेळाडूंनी सहभाग घेत १० सुवर्ण तर ५ रौप्य पदकांची कमाई करत पहूरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला.
सुवर्ण पदकांची मानकरी –
गौरी कुमावत ,सानिका पाटील,वैष्णवी घोंगडे ,वर्षा राऊत ,श्रावणी लोहार ,नंदिनी सोनवणे ,जयश्री घोंगडे ,जागृती चौधरी, तृप्ती घोंगडे,लोचना चौधरी, यांची
सूवर्ण पदक प्राप्त मुलीची नाशिक विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली.
रौप्य पदकांचे मानकरी स्वाती चौधरी,वृषाली काळे,हर्षदा उबाळे ,वैष्णवी सोनवणे,गायत्री कुमावत.
तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश संपादित केल्याबद्दल शौर्य स्पोर्टस अकॅडमी चे उपाध्यक्ष बाबुराव अण्णा घोंगडे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, जयेश बाविस्कर श्रीकृष्ण चौधरी ,सुनिल मोरे शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक अँड संजय पाटील ,शंकर भामेरे, किरण जाधव ,प्रकाश जोशी , संचालिका वैशाली घोंगडे कल्पना बनकर यांनी अभिनंदन कौतुक करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
खेळाडूंना शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे सचिव तथा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.