ग्रामसेवक सुरेश काळे यांना राज्यस्तरीय विकासाचा दिपस्तंभ पुरस्कार प्रदान …. माझे आई-वडील, पत्नी मार्गदर्शक, व माझ्या सामाजिक चळवळीतील सर्व सहकारी अधिकारी मित्रांना समर्पित..!

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत.
सोयगाव तालुक्यातील देव्हारी व टिटवी येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश काळे याना समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान व आपले ज्ञानपंख वृत्तपत्र आयोजित पुरस्कार सोहळा कार्यक्रमात राज्यस्तरीय विकासाचा दीपस्तंभ पुरस्कार  मोठ्या सन्मानात मान्यवरांच्या हस्ते परिवारासह प्रदान करण्यात आला  या सोहळ्यात त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेली उल्लेखनिय कामगिरीची  दखल घेऊन  परिवारासमक्ष वडील गणेशराव काळे,आई कांताबाई काळे, पत्नी कल्पना काळे, मुलगा मयूर गौरविण्यात आले ज्येष्ठ साहित्यिक डॉ.ऋषिकेश कांबळे, सुप्रसिद्ध विचारवंत तथा गाढे अभ्यासक प्राचार्य नामदेवराव चापे सर , समीक्षक तथा साप्ताहिक झेपचे संपादक डी. एन जाधव, कवी तथा साहित्यिक प्रा.शिवाजी वाठोरे, आयोजक तथा आपले ज्ञानपंखचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, कार्यकारी संपादक प्रवीण तायडे, उपसंपादिका जयश्री सोनवणे, सहसंपादक संजय दांडगे  माझे मित्रवर्य व सिंघम API  देविदास वाघमोडे साहेब पिशोर पोलीस ठाणे आदी मान्यवरांच्या हस्ते हा “राज्यस्तरीय विकासाचा दिपस्तंभ पुरस्कार” त्यानां प्रदान करण्यांत आला.. ज्या महापुरुषाने या देशांत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे खरे साधन आहे हे लक्षात घेऊन समाजउद्धारासाठी आपले जीवन झोकून देऊन विकासाचे कार्य केले त्या थोर लोकांच्या इतिहासाचे  आदर्श समोर ठेऊन आपल्या क्षेत्रात अहोरात्र कार्य केले म्हणून  हा पुरस्कार देताना आम्हाला  अत्यंत मनस्वी आनंद होत  आहे असे मुख्य संपादक दशरथजी सुरडकर म्हणाले आपण निस्वार्थी पणाने करीत असलेल्या कार्याची आपल्या पाठीमागे कुणीतरी नक्कीच दखल घेतअसतात त्यांच्या मते हा पुरस्कार  आई-वडील,पत्नी ,मार्गदर्शक, सहकार्य करणाऱ्या सर्व सहकारी मित्रांना समर्पित …
                           या पुरस्कार प्रदान सोहळा प्रसंगी  समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान व आपले ज्ञानपंख वृत्तपत्र च्या टीमने गेल्या महिनाभरापासून विशेष धावपळ करुन, मेहनत घेऊन, सखोल प्रयत्न करुन हा पुरस्कार सोहळ्याचा क्षण अत्यंत यशस्वीरित्या संपन्न केला. त्या सर्व आयोजकांचे देखील मनस्वी आभार  मित्र परिवार सरपंच समीरखा तडवी, सरपंच संध्याताई भागवत जाधव, उपसरपंच मिराबाई उत्तम चव्हाण, उपसरपंच लहू प्रेमसिंग राठोड व दोन्हीही गावातील ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी अधिकारी परिसर पंचक्रोशीतील पत्रकार बंधू  या सर्वांनी त्यानां शुभेच्छा दिल्या केलेल्या कार्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहॆ
0 9 3 8 5 6
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *