तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा
सिंदखेड राजा:
हजरत गौस ए आझम दस्तागिर बाबा दर्गा सिंदखेड राजा हे सर्व धर्मीय लोकांचे जागृत श्रध्दा स्थान असून येथे लाखो लोक भारताच्या काना कोपऱ्यातून येतात.
भारत गौरव श्री अल्हज असद बाबा हे राष्ट्रीय एकता तथा सर्व धर्म समभाव चे प्रेरक होते. त्यांनी आपले आयुष्य दीन दुबळ्या लोकांच्या सेवे मध्ये अर्पण केले. लाखो लोकांना एकता, बंधुता , सामाजिक संगोपन, शांती आणि अखंड तेचा महा संदेश असद बाबा यांनी दिला.
दरवर्षप्रमाणे या वर्षी सुद्धा हजरत दस्तागीर बाबांच्या ४४वा वार्षिक उत्सव निमित्याने शाही चादर आणि निशान साठी विशेष विदेशी पाहुणे हजेरी लावनर आहे त्यामधे जगप्रसिद्ध उद्योपती श्री बु-अब्दुल्ला (२७०कंपन्यांचे चैरमन दुबई), डॉ सर्गी डवर्यनोव (ब्रिक्स देशाचा अध्यक्ष,रशिया), श्री दूनावित पोल्सावत थायलंड चे राजदूत आणि श्री इंडी गिंतिंग इंडोनेशिया चे राजदूत तसेच अभिनेते राहुल वोहरा, मराठी अभिनेते संदीप पाठक, उद्योजक गणपत कोठारी, डॉ सुकेश झंवर (सीएमडी बुलढाणा अर्बन),नुरुद्दिन सेववाला (इंटरनॅशनल जायंट ग्रुप मुंबई), डॉ संजय चोरडिया (अष्यक्ष सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट पुणे), स्वामी देवेंद्र भाई महाराज (जैन साधक), मौलाना कल्बे ऋषेद रिझवी (दिल्ली), महंत कबीर दास महाराज पोहरादेवी, महंत जितेंद्र महाराज (पोहरादेवी), उपस्थित राहणार आहे . राहणार आहे.
सिंदखेडराजा येथ प.पु.गुरुवर्य अल्हाज असदबाबा यांच्या स्मृति पित्यर्थ हजरत गौस ए आझम दस्तगीर बाबा बहुद्देशीय संस्था सिंदखेड राजा , असनाज हेल्थकेयर एजुकेशन एंड रिसर्च फाउंडेशन मुंबई , लायन्स क्लब ऑफ जालना, यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग आणि नेत्ररोग तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या शिबीर साठी महाराष्ट्रतील नामांकित रुग्णालय आणि नामवंत तज्ञ डॉक्टर आपली हजेरी लावणार आहे.