सतिश मवाळ .हिवरा आश्रम विवेकानंद नगर येथे विविध स्पर्धांच्या आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे जिल्हा वक्ता पुरस्कार हा आयोजित स्पर्धेच्या माध्यमातून वितरित करण्यात आला त्यात देऊळगाव माळी येथील विद्यालयाची कुअर्पीता अनंत गि-हे हीणे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला 1111 रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र या पुरस्काराचे स्वरूप आहे.
इसरो या अंतराळ संशोधन केंद्राच्या फिरत्या प्रयोगशाळेच्या उपस्थितीत पार पडलेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये चि. ओम देशमाने व आदित्य सुरूशे या विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यासोबतच रांगोळी स्पर्धेमध्ये कु.भक्ती संजय जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावत आपल्या कलागुणांची चुणूक दाखवली .त्यांच्या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.अनिल कुमार गाभणे सचिव किशोर गाभणे उपाध्यक्ष दि.स.अंभोरे प्राचार्य विश्वनाथ बाहेकर पर्यवेक्षक म.वि गाभणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक व आई वडिलांचे आशीर्वाद यांना देतात
Users Today : 22