गडहिंग्लज ः प्रत्येक तहसीलमध्ये सैनिक कक्ष स्थापन करण्याच्या मागणीचे निवेदन जय जवान जय किसान फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने ऋषीकेत शेळके यांना दिले.
——————————————————
प्रत्येक तहसीलमध्ये सैनिक
कक्ष स्थापन करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ ः जिल्ह्यात आजी-माजी सैनिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या महसूलविषयक समस्या अधिक आहेत. यामुळे प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात सैनिक कक्ष स्थापन करण्याची मागणी जय जवान जय किसान फाउंडेशनने केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले निवेदन येथील तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्याकडे सुपूर्द केले. त्यात म्हटले आहे, ‘जिल्ह्यात तिन्ही सैन्यदलासह अर्धसैनिक दलामध्ये कार्यरत सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. निवृत्त जवानांची संख्याही अधिक आहे. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये महसूल विषयक व अन्य विभागांशी संबंधित कामांसाठी कार्यालयामध्ये ये-जा करावी लागते. यात वीरपत्नी तसेच वयस्कर निवृत्त जवानांना कार्यालयात आपले काम करून घेण्यास अनेक अडथळे येतात. यामध्ये महसूलविषयक समस्या अधिक प्रमाणात आहेत. यामुळे महसूलविषयक समस्यांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात स्वतंत्र सैनिक कक्ष स्थापन करून सैनिकांच्या समस्या सोडवाव्यात. या मागणीची गांभीर्याने नोंद घेऊन कार्यवाही व्हावी, अशी मागणी आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील, नेजगोंडा पाटील, बसाप्पा आरबोळे, शशिकांत जाधव, जयवंत नांगरे, शशिकांत चौगुले, रणजित पाटील, ए. डी. पोवार, राजाराम रक्ताडे, वीरपत्नी राधाबाई तेलवेकर, मंगल कदम, सविता बिरंजे आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.
प्रत्येक तहसीलमध्ये सैनिक कक्ष स्थापन करण्याची मागणी
0
9
4
1
7
8
Users Today : 14
Leave a comment