मेहकर: नगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून जबरदस्तीने बांधकाम सुरू केले

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर

येथील गुलाम मोहंमद राज मोहंमद व इतर चार जणांच्या वडिलोपार्जित ६२ आर जमीन (जमीन सर्वे नंबर १५, जानेफळ रोड) वर मेहकर नगरपालिकेने न्यायालयाच्या तात्पुरत्या मनाई हुकूमाचा अवमान करत जबरदस्तीने बांधकाम सुरू केले, अशी तक्रार जमीनमालकांनी केली आहे.
जमीनमालकांच्या म्हणण्यानुसार, मेहकर नगर परिषद या जमिनीवर विकासाच्या नावाखाली व्यापारी गाळे बांधून श्रीमंतांना महागात विकण्याचा घाट घालत होती. या प्रकरणी जमीनमालकांनी न्यायालयात तक्रार केली आणि २६ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने ‘जैसे थे’ तात्पुरता मनाई हुकूम दिला, ज्यामध्ये या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम ठरविण्यास मनाई होती.
मात्र, १३ मार्च रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राम कापरे, विशाल शिरपूरकर, शे. जफर, शे. करीम, अनिल रामदास मुळे, सय्यद अख्तर, प्रदीप बुंधे आणि ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांनी मनाई हुकूमाचा अवमान करत बांधकाम सुरू केले. बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केल्यावरही संबंधित अधिकारी अरेरावी करीत काम चालू ठेवले.
याप्रकरणी गुलाम मोहंमद यांनी मेहकर न्यायालयात प्रकरण दाखल केले, आणि न्यायालयाने सर्व संबंधितांना नोटिस बजावून जाब विचारला.
जमीनमालकांचे म्हणणे आहे की, संबंधित जागा ही नगरपालिकेच्या अखत्यारित असलेली जागा आहे, परंतु न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात बांधकाम सुरू करणे हे कायदेशीर दृष्टीने गंभीर आहे. या प्रकरणामुळे नगरपालिकेच्या अधिकार आणि कायद्याचा आदर करण्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

0 9 4 1 7 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *