लोणार सरोवर विकास समितीतील कामे संथ; आमदार सिद्धार्थ खरातांची सुधारीत आराखड्याची मागणी

KHOZ MASTER
1 Min Read

लोणार

लोणार सरोवर विकास समिती अंतर्गत विविध विभागांकडून सुरू असलेल्या विकास कामांची गती अत्यंत संथ असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत आमदार सिद्धार्थ खरात यांनी विकास कामे लवकर पूर्ण करण्याची तसेच सरोवरासाठी सुधारीत आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे.
विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली १४ मार्च २०२६ रोजी लोणार सरोवर विकास आराखड्याची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, पुरातत्व विभाग, वन्यजीव प्राणी विभाग, वनविभाग, महसूल व नगरपरिषद विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केले आहे की, समितीत लोकप्रतिनिधी व स्थानिक अभ्यासकांचा समावेश नसल्यामुळे कामांची माहिती नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे सरोवराच्या संवर्धन व विकासासाठी समितीत स्थानिक प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींचा समावेश आवश्यक आहे.
याशिवाय कोविडच्या काळात अंघोळीसाठी बंद केलेले धारतीर्थ पुन्हा सुरू करण्याची, रस्त्याच्या बाजूला तयार झालेल्या १–२ फूट नाल्यांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत असल्याने साईड भरण्याची गरज तसेच शहर सौंदर्यकरण व पर्यटक सुविधा यांचा सुधारीत विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर इतिहास अभ्यासक गजानन खरात, शिवसेना तालुका प्रमुख राजू बुधवत, बादशाह खाण, सुदन अंभोरे यांसह नागरिकांच्या सह्या आहेत.

0 9 4 1 7 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *