बुलडाणा –
बुलडाणा जिल्हा ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनासाठी महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. चिखली विधानसभेच्या लोकप्रिय विकास आमदार श्वेताताई महाले (पाटील) यांनी या जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांना पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
आमदार महाले यांनी चिखली तालुक्यातील करखंड गावातील “52 बुर्ज” या पुर्वजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक वस्तूला राज्याच्या नकाशावर आणले. आता या ऐतिहासिक बुर्जाला ‘करवंड बावन बुर्जी’ म्हणून ओळखले जाते.
सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून १५ एप्रिल २०२६ रोजी या ठिकाणी शिवविवाह स्मृती भव्य ऐतिहासिक महोत्सव आयोजित होणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे बुलडाणा जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार श्वेताताई महाले यांच्या अथक प्रयत्नांमुळे करखंड गाव केवळ सामान्य गाव राहिलेले नाही, तर ते स्वराज्याच्या इतिहासाशी जोडलेले महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाईल. तसेच पर्यटकांच्या भेटीमुळे येथील स्थानिक उद्योजकांना नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील.
या ऐतिहासिक आणि विकासात्मक उपक्रमाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, भिमरत्न पुरस्कार प्राप्त प्रा.इंजिनियर भैयासाहेब पाटील, चिखली तालुकाध्यक्ष हिम्मराव जाधव, तसेच अनेक अन्य सामाजिक कार्यकर्ते आणि नेते उपस्थित राहून आमदार श्वेताताई महाले यांचे अभिनंदन केले. त्यांनी त्यांच्या भावी विकास कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Users Today : 14