कागल : अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यास कागल पोलिसांनी पकडले

Khozmaster
1 Min Read

कागल : चारचाकीमधून अवैधरित्या दारु वाहतूक करणाऱ्यास कागल पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ७३ हजार ३२० रुपयांच्या दारूसह मोटार असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कागल – मुरगूड रोडवर अनंत रोटो वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रोहीत बाळासाहेब फराकटे (फराकटेवाडी, ता. कागल) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कागल – मुरगूड रस्त्यावरून चारचाकीमधून दारुचा अवैधरित्या मोठा साठा नेला जात असल्याची माहिती कागल पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *