प्राथमिक विद्यामंदिरचा क्रीडा महोत्सव

Khozmaster
3 Min Read

इचलकरंजी : क्रीडा मैदानाचे पूजन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.प्राथमिक विद्यामंदिरचा क्रीडा महोत्सवइचलकरंजी : देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यामंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव झाला. रोटरी क्लब ऑफ हेरिटेजच्या अध्यक्षा रितू हरिष मर्दा प्रमुख उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी अनिता खंजिरे होत्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रीडाज्योत प्रज्वलनाने केली. मर्दा यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगितले. सोनाली चव्हाण, मेहराज तहसीलदार, तस्मीन तहसीलदार, अर्चना सुतार, युनूस मुल्ला आदी उपस्थित होते.ich134.jpg

50936
इचलकरंजी : मान्यवरांच्या हस्ते क्रीडा मैदानाचे पूजन केले.
चौगुले प्राथमिक विद्यामंदिरचा क्रीडा महोत्सव
इचलकरंजी : कै. सौ. डॉ. जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यामंदिर श्री आदिनाथ पिराप्पा केटकाळे बालमंदिर व शिशुगटचे वार्षिक क्रीडा महोत्सव उद्‍घाटन डॉ. पी. जे. बडबडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन केले. अध्यक्षस्थानी सुभाष बलवान होते. क्रीडा ज्योतीचे स्वागत व पूजन लेझीम व ढोल-ताशाच्या गजरात रवींद्र लाटकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी खेळाचे व क्रीडामहोत्सवाचे महत्त्‍व सांगितले. अनिल चौगुले, सी. डी. लडगे, रवींद्र पाटील, मुख्याध्यापिका वर्षा हुल्ले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन करून आभार तानाजी कांबळे यांनी मानले.
साई इंग्लिश स्कूलचे यश
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे राजीव गांधी भवन येथे घेतलेल्या जिल्हास्तरीय शासकीय तायक्वॉंदो स्पर्धेत साई इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यानी यश मिळवले. स्पर्धेत श्रद्धा घोरपडे आणि श्रावणी मोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना मुख्याध्यापक आर. एन. आळतेकर, मिलिंद कांबळे, जगदीश पुजारी, गजानन लवटे, अमृता तडाखे यांचे मार्गदर्शन लाभले.

ich136.jpg
50938
इचलकरंजी : व्यंकटेशच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.

‘बालाजी’तर्फे वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा
इचलकरंजी : बालाजी शिक्षण समूहाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे उद्‍घाटन महेश क्लब ऑफ इचलकरंजी येथे मदनराव कारंडे यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिल्‍ह्यामधून लहान गटासाठी ५५ तर मोठ्या गटासाठी ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चित्रकला स्पर्धेमध्ये लहान गटासाठी ७५ तर मोठ्या गटासाठी ७४ जणांनी सहभाग घेतला होता. मुख्याध्यापिका मंजुषा रावळ, सुधाकर शिंदे, कपील पिसे, अॅड. गणेश भोई, प्रतिभा पैलवान, एन. एफ. पटेल, सुहास पाटील आदी उपस्थित होते.
—————–
ich137.jpg
50939
इचलकरंजी : न्यू इंग्लिश स्कूलच्या १९८८ मधील दहावी ‘ब’ चे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याला उपस्थित होते.

न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
इचलकरंजी : येथील डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल (पूर्वीचे दि न्यू इंग्लिश स्कूल) च्या १९८८ च्या दहावी ‘ब’ माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. सुमारे चाळीसहून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी ३५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. तेजस्विनी कोळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अमोल परीट यांनी सूत्रसंचालन केले. संतोष फातले यांनी आभार मानले.

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *