पोर्ले तर्फ ठाणे ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

Khozmaster
1 Min Read

पोर्ले तर्फ ठाणे ग्रामसभेत
विविध विषयांवर चर्चा
पोर्ले तर्फ ठाणे, ता. १३ ः पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे आयोजित विशेष ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी सरपंच वनिता तानाजी भोपळे होत्या.
ग्रामविकास अधिकारी शिवाजी पाटील यांनी विषय वाचन केले. यामध्ये सुरळीत पाणी पुरवठा, मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्मशानभूमी दुरुस्ती, अंगणवाडी रंगरंगोटी व अंगणवाडीतील मुलांना गणवेश, महिला व बालकल्याण विभागासाठी निधी राखीव, गावांतर्गत रस्ते, गटार व मोरी बांधका आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.
कृषी सहायक अश्‍विनी नाईक यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पी. एम. किसान योजनेतील त्रुटींबाबत मार्गदर्शन केले. दिनकर चौगुले यांनी गायरान जमिनीत वनौषधींची लागवड व निसर्ग संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. सभेत रामराव चेचर, तानाजी खुडे, उमेश शेलार, नीलेश घाडगे, दयानंद चौगुले, सुरेश चेचर, सदाशिव चौगुले यांनी चर्चेत सहभाग घेतला. या वेळी उपसरपंच सागर चेचर, संभाजी जमदाडे, शहाजी खुडे, जीवन खवरे, अरुण पाटील, डॉ. अरुण पाटील, सचिन चोपडे, एम. एम. पाटील, नम्रता घाडगे, गीता चौगुले, रजनी गुरव, अनुराधा पाटील, अश्‍विनी संकपाळ, संगीता बुचडे, तलाठी नसीम मुलाणी, तानाजी मोरे, तानाजी भोपळे, विकास घाटगे, शहाजी पाटील, चंद्रकांत जमदाडे उपस्थित होते. जीवन खवरे यांनी आभार मानले.

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *