पुणे – मोटारीचा धक्का लागल्यामुळे झालेल्या किरकोळ वादातून मोटारचालकाचा खून केल्याची घटना फुरसुंगी परिसरात मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुणे – मोटारीचा धक्का लागल्यामुळे झालेल्या किरकोळ वादातून मोटारचालकाचा खून केल्याची घटना फुरसुंगी परिसरात मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आरोपींनी भोसले आणि भाच्याला शिवीगाळ केली. हा वाद मिटवत असताना आरोपींनी भोसले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर आरोपींनी भाच्यालाही मारहाण करून ते पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या भोसले यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.
Users Today : 0