दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान पद भूषवणारे लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नागरे सरांचे सिद्धी निकेतन वस्तीगृह या ठिकाणी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यानिमित्त वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी भाषणे करून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिले यानिमित्ताने या निमित्ताने प्रश्न उत्तरे स्पर्धा घेऊन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे माजी सैनिक मित्र भीमराव चाटे सर श्री वाघ सर श्री भालेराव सर यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून देशभक्तीसाठी प्रेरित केले सिद्धी निकेतन वस्तीगृहाचे संचालक श्रीराम नागरे सर जाधव सर उपस्थित होते . शालेय व अकॅडमिक विद्यार्थ्यांनी विचार मांडले
एकाच दिवशी जन्मले, दोनपुरुष महान
एक झाला उंच,
दुजा राहिला लहान
एकाची आरती, रघुपति राघव राजाराम
दूजाची कृती, जय जवान जय किसान
एकाचा स्वातंत्र्यासाठी अहिंसक सत्याग्रह
दुजाचा फक्त खऱ्यासाठी आश्वासक आग्रह
एकाला जगाने म्हटले आधुनिक बुद्ध
दुजाने शांतपणे जिंकले, देशावरचे युद्ध
दोघांचे जीवन सार्वजनिक अन् मृत्यु अकस्मात्
एकाची सर्वांदेखत हत्या, दुजाचा गुपचुप अपघात
एकाचा खुनी जगाला कारणासाहित कळला
दुज्याच्या नावाचा मुद्दाही राजकारणात गळाला
एकाचे उभारले देशभर पुतळे
दुजाचे नावही क्वचितच कळे
एक आता रोज पैशाच्या सगळ्या नोटांवर हसतो
दुजा दरवर्षी फक्त एकदाच पेपरात फोटोमध्ये दिसतो
एकाचे विचार महान पण आचरतो कोण
दुजाचे आचार महान पण विचारतो कोण
देशाचे दोन अनमोल रत्न
आयुष्यभर देशसेवा प्रयत्न
एक झाले राष्ट्रपिता दुसरे पंतप्रधान
दोघांनाही आम्ही स्मरतो साकारतो घोष तो
जय जवान जय किसान
माझा भारत देश महान माझा भारत देश महान
सैनिक मित्र फाउंडेशन कृत महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी देऊळगाव राजा व सिद्धी निकेतन च्या 200 मुलांकडून कडून दोन्ही महामानवास विनम्र अभिवादन करून शेवटी कार्यक्रमाची सांगता झाली श्री राम नागरे सरांनी सैनिक मित्र फाउंडेशन चे आभार मानले.