येवलेवाडीत खड्ड्यात झाडे लावत निषेध; येवलेवाडी चौक ते बोपदेव घाट मार्गावरील रस्त्याच्या दुरावस्था

Khozmaster
1 Min Read

कोंढवा : येवलेवाडी चौक ते बोपदेव घाट मार्गावरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याचा स्थानिकांकडून निषेध नोंदविण्यात आला. येवलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन करण्यात आले.

भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालींदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सदरचा रस्ता हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा आहे. सदर मार्गावर महाविद्यालय असून विद्यार्थ्यांची ये-जा असते.

तसेच सासवड मार्गाने ये-जा करणारे शेतकरी नागरिक याच रस्त्याचा वापर करत असतात. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे वारंवार अपघात होतात। नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने अशा प्रकारच्या अंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे कामठे यांनी सांगितले. पुढील आठ दिवसात जर सदर मार्गाची दुरुस्ती झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सार्वजनिक बांधकाम खात्या विरोधात यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.

यावेळी माजी उपसरपंच दादासाहेब कामठे, संदीप धांडेकर, संजय शेंडकर, विजय धांडेकर, मच्छिंद्र धांडेकर, उत्तम जावीर, देवराम देवकाते, बाप्पू गुंजाळ यांच्यासह येवलेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *