भारताने चीनला टाकले मागे…!! पुण्यात नोंदविला नवा विश्वविक्रम

Khozmaster
2 Min Read

Pune News : वेळ सकाळी नऊ-दहाची…एकामागोमाग एक पालक आणि मुलं मैदानावर जमली. पालकांनी गोष्टीचे पुस्तक हातात घेतलं…अन्‌ मोठ्या उत्सुकतेने त्यातील गोष्ट आपल्या समोर बसलेल्या मुलांना वाचून दाखविली. याप्रकारे एकाच वेळी तीन ते पाच मिनिटे एकत्रित पुस्तक वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

अन्‌ ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ या उपक्रमात तब्बल तीन हजार ६६ पालक सहभागी होत…पालक आणि विद्यार्थी यांच्या साक्षीने भारताने चीनचा विश्वविक्रम मोडून काढत नवा विश्वविक्रम नोंदविला.

निमित्त होते राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त पुणे महानगरपालिकेने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानात ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ उपक्रम आयोजित केला होता.

या उपक्रमाच्या विश्वविक्रमाची नोंद झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजर आणि देशभक्तिपर गीते याद्वारे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक जय काकडे,

शिक्षण प्रसारक मंडळीच्या व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, न्यासाचे संचालक युवराज मलिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, संयोजक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे, भाग्यश्री मंठाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

वाचन संस्कृतीचा चालना देण्यासाठी गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास तीन हजाराहून अधिक पालक आणि त्यांची पाल्य हे मैदानावर आले होते. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांना क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या ‘निसर्गाचा नाश करू नका’

या पुस्तकातील धड्याचे सलग तीन मिनिटे वाचन केले आणि त्याची गिनेस बुक रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ या उपक्रमाद्वारे नवा विश्वविक्रम भारताच्या नावाने प्रस्थापित केल्याचे जाहीर केले.

त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले. प्राजक्ता माळी यांनी उपस्थित मुलांना, पालकांना वाचन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी चैतन्य कुलकर्णी यांनी मराठी गीतांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

…अन्‌ चीनचा रेकॉर्ड मोडला

‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ या उपक्रमाचा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता. चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार ४७९ पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या. त्यानंतर गुरुवारी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर तीन हजार ६६ पालकांनी एकत्रित येत, आपल्या पाल्यांना गोष्ट वाचून चीनचा विक्रम मोडीत काढून नवा विश्वविक्रम नोंदविला.

0 9 3 8 6 9
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *