वाघोली : पूर्व हवेलीतील तीन महत्त्वाच्या वाघोली, पेरणे व वाडेबोलाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका व इतर कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्या या तिन्ही केंद्राची मेडिकल अधिकारी यांच्यावरच भिस्त आहे.
या केंद्रात दररोज सुमारे 150 पेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. आपल्या विविध मागण्यासाठी राज्य परिचारिकांनी आज पासून संप पुकारला आहे. त्यात हे कर्मचारी सहभागी झाले आहेत.
वाघोलीचा महापालिकेत समावेश झाला असला तरी आरोग्य सेवा जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून आहे. सध्या वाघोलीची लोकसंख्या सुमारे अडीच लाखापेक्षा अधिक आहे.
या केंद्रातील परिचारिका व इतर कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र कायम स्वरुपी नसलेल्या पाच परिचारिका संपात सहभागी नाहीत. यामुळे त्यांची मदत होत आहे. वाडेबोलाई येथील परिचारिकाही संपावर गेल्या आहेत. तेथे एकच परिचारिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी आहे. तर पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील
सहा परिचरिकासह अन्य पाच कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे तेथे ही वैद्यकीय अधिकाऱ्यावर केंद्राची भिस्त आहे. या तिन्ही केंद्राला आजू बाजूची गावे जोडलेली आहेत. दररोजचे रुग्ण, प्रसूती रुग्ण,
बालकांचे लसीकरण, आरोग्य सर्वेक्षण आदी कामे केंद्राला असतात. परिचारिका व अन्य कर्मचारी संपावर गेल्याने या सर्व कामावर त्याचा परिणाम होणार आहे. तर रुग्णांनी अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती
- दररोज तपासणीसाठी येणारे रुग्ण — 100 पेक्षा अधिक.
- महिन्याच्या प्रसूती — किमान 10
- वैद्यकीय अधिकारी — दोन
- आजूबाजूची जोडलेली गावे — किमान 3 ते 4
- परिचारिका बरोबर प्रयोग शाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक संपावर.
Users Today : 5