थेरगाव करसंकलन विभागाकडून १७ व्यवसायिक मिळकती सील

Khozmaster
1 Min Read

वाकड – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभाग अंतर्गत थेरगाव करसंकलन विभागाच्या वतीने बुधवारी (ता. १३) सकाळी मिळकतकर थकबाकी धारकांसाठी जप्ती मोहिम राबविण्यात आली. रहाटणी गट क्रमांक ४ येथील १७ बिगर निवासी (व्यावसायिक) मिळकती जप्त करून त्या सील करण्यात आल्या.संबंधीत मिळकतधारकांना यापूर्वी जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आलेली असूनही थकबाकी कराचा भरणा न केल्याने बुधवारी धडक कारवाई करण्यात आली. ही जप्ती मोहीम मार्च २०२४ अखेर पर्यंत अशाच प्रकारे तीव्र स्वरूपात चालू राहणार आहे.ही मोहीम थेरगाव करसंकलन विभागातील सहाय्यक मंडल अधिकारी श्रद्धा बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख संतोष बांदल, मिलिंद कांबळे, हिरालाल साखरे, हेमंत जाधव, सदाशिव कोंडे, सोमनाथ लांडगे, संजय भाट, बेबी काळे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

प्रतिक्रिया

नोटीसा बजावूनही अनेक बिगर निवासी मिळकतधारक कराचा भरणा करत नाहीत. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार आमच्या थेरगाव विभागाकडून जप्तीची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. ही कारवाई आणखी तीव्र होणार आहे. आपल्या मिळकतीवर जप्तीची कारवाई होण्याआधी मिळकतधारकांनी खबरदारी घेत कर भरावा.

0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *