अहमदनगर : भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील कानिफनाथांच्या श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून विश्वस्तांमध्ये जोरदार हाणामारी झाली. गावातील युवकांनीही बैठकीत शिरून लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. यामध्ये अध्यक्ष संजय मरकड जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नगर शहरात हलविण्यात आले आहे. गुरूवारी दुपारी मढीमध्ये देवस्थानच्या आवारातची ही घटना घडली. काही विश्वस्त आणि युवकही यामध्ये जखमी झाले आहेत.
विविध कारणांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या मढी देवस्थानच्या विश्वस्थ मंडळात अध्यक्षपदावरून दोन गटांत मागील काही दिवसांपासून धूसफूस सुरू आहे. यामुळे गुरुवारी देवस्थानच्या सभागृहामध्ये विश्वस्तांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलासंबंधी निर्णय घेण्यात येणार होता. यावर चर्चा सुरू झली असतानाच तेथे दोन गटात वाद सुरू झाला.
Users Today : 2