सिगारेट पेटवण्यासाठी माचीस दिली नाही म्हणून दगड डोक्यात घातला; सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू

Khozmaster
3 Min Read

 मुंबई: व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांना समोर काय सुरू आहे याचे देखील भान राहत नाही. व्यसनासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. त्यात घरच्यांनी जर व्यसन करून नको चांगले नाही, असे सांगितले तर अगदी शुल्लक करणांवरून टोकाची भूमिका घेतलेल्या घटना समोर येतात. दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात केली हत्या किंवा इतरही वेगवेगळ्या घटना घडलेल्या ऐकायला मिळतात. आता अशीच एक घटना तुर्भे परिसरात घडलेली चर्चेचा विषयी बनली आहे.

तुर्भे येथील एका व्यक्तीने कंपनीच्या गेटवर सुरक्षा रक्षकाकडे सिगारेट पेटवण्यासाठी माचीस मागितली आणि त्या व्यक्तीकडे माचीस नसल्यामुळे तिने नाही म्हणून सांगितले. यावर माचीस दिली नाही म्हणून चक्क त्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून व्यसनी माणसांची दहशत निर्माण झाल्याचे चित्र नवी मुंबई शहरात पाहायला मिळाले आहे.नवी मुंबईतील तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीत तुर्भे नाका या ठिकाणी एका कंपनीच्या गेटवर प्रसाद भानुशाली या सुरक्षा रक्षकाची एका शुल्लक कारणावरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी मोहम्मद अली याला पोलिसांनी अटक केली असून,त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मोहम्मद अली याने सुरक्षा रक्षक प्रसाद भानुशाली याच्याकडे सिगारेट पेटवण्यासाठी माचिस मागितली. भानुशाली याच्याकडे माचीस नसल्याने त्याने नकार दिला,केवळ येवढ्या कारणाने आरोपीने भानुशाली याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. मात्र सिगारेट पेटवण्यासाठी माचिस दिली नाही म्हणून खून केल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.नवी मुंबईतील तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीत तुर्भे नाका या ठिकाणी एका कंपनीच्या गेटवर प्रसाद भानुशाली या सुरक्षा रक्षकाची एका शुल्लक कारणावरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी मोहम्मद अली याला पोलिसांनी अटक केली असून,त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मोहम्मद अली याने सुरक्षा रक्षक प्रसाद भानुशाली याच्याकडे सिगारेट पेटवण्यासाठी माचिस मागितली. भानुशाली याच्याकडे माचीस नसल्याने त्याने नकार दिला,केवळ येवढ्या कारणाने आरोपीने भानुशाली याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. मात्र सिगारेट पेटवण्यासाठी माचिस दिली नाही म्हणून खून केल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *