महामार्गावर ट्रकने घेतला पेट; लाखोचे इलेक्ट्रॉनिक भंगार जळुन खाक

Khozmaster
1 Min Read

नसरापूर – पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक करणारया ट्रक ने अचानक पेट घेतला या घटनेत ट्रक मधील लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक भंगार ट्रकसहीत जळुन खाक झाले आहे.मुंबईहुन चेन्नईकडे जुने लॅपटॉप काॅम्पुटर इलेक्ट्रॉनिक पार्ट घेऊन निघालेला ट्रक भोर तालुक्यातील निगडे गावच्या हद्दीतुन जात असताना मागील बाजूने अचानक पेट घेतला रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी ट्रक चालकाला ट्रक मागुन पेटल्याची माहिती दिल्यावर चालकाने ट्रक एकाबाजूला घेतला तो पर्यंत ट्रक ने जास्त पेट घेतला होता. चालक व क्लिनरने ट्रक मधुन त्वरित बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही.किकवी पोलीस व महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत भोर अग्निशमन केंद्राचा बंब मागवला परंतु बंब येई पर्यंत ट्रक साहित्यासह पुर्ण जळुन खाक झाला.

0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *