शिरूर प्रतिनिधी: फैजल पठाण. बुधवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता ज्ञानगंगा विश्वविद्यालय बाबुराव नगर शिरूर येथे , माता अनुसया प्रोडक्शन मुंबई यांच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत असणाऱ्या बालनाट्य संस्थेने शिरूरमध्ये भव्य बालनाट्य महोत्सव सादर केला. या कार्यक्रमांमध्ये हॅपी बर्थडे, डोरेमॉन, जंगली बाणा, निंजा टॉम, यासारखे लहान मुलांना आवडणारी व ग्रामीण भागात नवनवीन बालकलाकारांना अभिनयासाठी प्रोत्साहित करुन तसेच या बालनाट्य महोत्सवातून वृक्षतोड थांबवा! प्राण्यांवर प्रेम करा! शिक्षण घेत असताना लहान मोठ्यांचा आदर बाळगा! यासारखे असंख्य सामाजिक संदेश देवुन तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये क्रांतिकारी महापुरुषांचा इतिहासही सादर गेला. यामध्ये शिरूर मधील बाल कलाकारांनीही सहभाग घेतला. तसेच त्यांना प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्हे देऊन कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाला बालमित्रांंबरोबर त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमा पूर्वी लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण भारदे सरांनी काही दिवसाची कार्यशाळा घेतली तसेच ज्ञानगंगा विश्वविद्यालयाचे संस्थापक चेअरमन प्राध्यापक राजाराम घावटे तसेच प्रा. डॉ नितीन घावटे (सीईओ ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी शिरूर), मुख्याध्यापक श्री संतोष येवले सर, सौ सुनंदा लंघे मॅडम (मुख्याध्यापक प्राथमिक विभाग) यांनी या कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिले .तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती प्रा. सुरेश गायकवाड (रंगभूमी, चित्रपट कलाकार), फैजल पठाण (चित्रपट कलाकार, पत्रकार) यांच्या उपस्थितीत पार पडला .दिग्दर्शक, लेखक-प्रवीण कुमार भारदे(माता अनुसया प्रोडक्शन बाल नाट्य मंच मुंबई) यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
Users Today : 6