छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत.
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही शासन विम्याचा प्रीमियम शासन भरणार आहे त्यामुळे एक रुपयात रब्बीतही शेतकऱ्यांना पीक विमा काढून घ्यावे; असे आवाहन सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आज शेवटची तारीख आहे ही डेडलाइन देण्यात आलेली आहे. यंदा बराऱ्याच पैकी शेतकरी खातेदार या योजनेमध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याचे सोयगाव कृषी विभागाने सांगितले.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास रब्बी पिकांना योजनेत संरक्षण मिळते. यंदा जमिनीत आर्द्रता नसल्याने पेरण्यांची मंदगती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होऊ शकतो. यामध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी सहभाग ऐच्छिक आहे. खातेदाराने वैयक्तिक कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी योजनेत सहभाग घेऊ शकतात. योजनेत गहू, हरभरा, कांद्यासह इतर पिकांचा समावेश करण्यात आला आहे.योजनेत यावर्षीपासून शेतकरी हिस्सा राज्य शासन भरणा करणार आहे. त्यामुळे फक्त एक रुपयात शेतकरी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी रब्बीचा पिक विमा काढून घ्यावे. या वर्षासाठी जोखीमस्तर हा ७० टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. मृत व्यक्तीच्या नावे विमा काढला गेल्यास तो प्रस्ताव रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सोयगाव कृषी विभागाने दिली.रब्बी हंगामासाठी पिकानुसान मुदत देण्यात आली आहे. यामध्ये गहु, कांदा, भुईमूग, हरभरा पिकासाठी आज शेवटची तारीख आहे. शेतकऱ्यांना विमा काढून घ्यावे. उन्हाळी भुइमूगासाठी ३१ मार्चपर्यंत पिक विमा काढता येणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केले आहे.पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणारी घट, पीक, लावणीपूर्व नुकसान उत्पादनात ७५ टक्क्यांपेक्षा कमी येत असल्यास, तसेच चक्रीवादळ, अवेळी पाऊस, यामुळे कापणी, काढणीनंतर सुकविण्यासाठी शेतात. पसरविलेले पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्त्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते.
शेतकऱ्यांनी विमा काढावा
रब्बी हंगामात केवळ एक रुपयात नोंदणी करता येते. सहभाग घेण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केले आहे.
या बाबी महत्त्वाच्या
“””बाधित पीक किंवा बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्याच्या ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. त्यानंतर कंपनीद्वारा पंचनामे करण्यात येणार आहेत.
सामूहिक सेवा केंद्रधारकाकडून प्रति अर्ज १ रुपयाचा भरणा करून विमा योजनेत सहभाग घेता येतो. यापेक्षा जास्त रकमेची मागणी झाल्यास जवळच्या सोयगाव कृषी विभागाकडे याची माहिती द्यावी.
मदन सिसोदिया तालुका कृषी अधिकारी सोयगाव
Users Today : 7