नागपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी कारभार, हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हे रुग्णालय उपचारासाठी की, रेफर टू.. साठी? हाच प्रश्न असतो. एका महिलेला रेफर केले जात असतांना तिचा रस्त्यातच झालेला मृत्यू, यावरून एक ‘लक्षवेधी’ आज बुधवार १३ डिसेंबरला विधानसभेत चर्चेला आली. हा विषय बुलढाणा मतदार संघातील असल्यामुळे, सभापतींनी यावर बोलण्यासाठी आ. संजय गायकवाड यांना बोलण्यासाठी पाचारण केले असता, त्यांनी सामान्य रुग्णालयाची लक्तरेच वेशीवर टांगली. यावेळी त्यांनी ९९ कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी त्यात सामील असणाऱ्या अधिकाऱ्याकडेच का दिली ? हा संदर्भ मांडतांना ९९ कोटीच्या भ्रष्टाचारात चोराच्या हाती चौकशी का ? असा सडेतोड प्रश्न उपस्थित केला.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महत्वपूर्ण लक्षवेधीवर बोलतांना आ. संजय गायकवाड पुढे म्हणाले की, सदर महिला उपचारासाठी भरती झाली असतांना सुविधेच्या अभावाचे कारण पुढे करून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला अकोला रेफर केले. त्या महिलेचा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अकोल्यात उपचार शक्य नसल्याने कारण तिथल्या डॉक्टरांनी तिला नागपूर रेफर केले. मात्र रस्त्यातच अमरावती ते नागपूर दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला.
आ. गायकवाड पुढे म्हणाले की, मागच्या अधिवेशनामध्ये याच सामान्य रुग्णालयात ९९ कोटी रुपयांचा औषध घोटाळा संदर्भात लक्षवेधी लावली असता त्यावेळी संबंधीत मंत्र्यांनी चौकशीची घोषणा केली होती. मात्र ही चौकशी चोराच्याच हाती देण्यात आली. वास्तविक ही चौकशी ज्यांनी घोटाळाकेला त्यांच्याकडे न देता, वरीष्ठ अधिकऱ्यांकडे द्यायला हवी होती. या सामान्य रुग्णालयात एका ड्रायव्हरच्या हाती तांत्रिक कामे सोपविण्यात आले असून, या चौकशीशी संबंधीत कागद पत्रे त्याने सादर केली नसल्याने शेवटी संबंधीतांना पोलिसात धाव घ्यावी लागली.. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे घोळ आहे. एमआरआय सारखी साधी मशिनही बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नसल्यामुळे असे मृत्यूचे तांडव मोठ्या प्रमाणात चालू असून हे सर्व थांबायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून मंत्री महोदयांना उत्तर मागितले.
Users Today : 7