पेनटाकळी कालव्याची दुरुस्ती होणार प्रकल्पातील जलसमाधी आंदोलनाला यश :कालवा फुटून खरडून गेलेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाईही मिळणार

Khozmaster
1 Min Read
मेहकर : आरसीसी ट्रफच्या नवीन कॅनॉलचे बांधकाम करून उर्वरित गावांना पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून पाणी न सोडल्याने व कालवा फुटून झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाईही देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रकल्पात करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाला यश आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पाणी न सोडल्यामुळे त्याची ४ हजार ४४८ हेक्टरची नुकसानभरपाई देणे, हा कालवा फुटून पेनटाकळी, ब्रह्मपुरी, रायपूर, पाचला या गावांच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना अदा करावी, या मागण्यांसाठी बुधवारी पेनटाकळी प्रकल्पामध्ये जलसमाधी
आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी संबंधित विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. ही बाब रविकांत तुपकर यांच्या निदर्शनास
आणून दिली.
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठांशी तातडीने दूरध्वनीवरून संपर्क करत माहिती दिली. तत्काळ दखल घेण्यास सांगितले. यानंतर
संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता चोपडे अमरावतीवरून व उपविभागीय अधिकारी व्यवस्थापन नवले हे बुलढाणा येथून आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांच्याबाबत जे. ई. शिंदे यांनी चर्चा करत सर्व मागण्या मान्य करत लेखी पत्र दिले. अड.जितुभाऊ अडेलकर राज्य प्रवक्ता रयत क्रांती संघटना मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलन
तात्पुरते स्थगित करण्यात आले.
0 9 3 8 7 1
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *