नागपूर: कारागृहातून बाहेर येताच प्रियकराने डोक्यावर दारूची बाटली फोडून प्रेयसीला जखमी केले. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अनारकली (वय ३५, बदललेले नाव) असे जखमीचे तर राकेश असे हल्लेखोर प्रियकराचे नाव आहे. अनारकली ही श्रमिक आहे. ती मूळ मध्य प्रदेशातील रहिवासी असून, पतीसोबत वाद झाल्याने १२ वर्षांपूर्वी दोन मुलींसह नागपुरात आली. कळमना बाजारात श्रमिक म्हणून काम करून उदरनिर्वाह करायला लागली. १० वर्षांपूर्वी तिची राकेशसोबत ओळख झाली. तेव्हापासून दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये राहायला लागले.
प्रेयसीच्या घरासमोर प्रियकराचा गोंधळ
बोलणे बंद केल्याने प्रियकराने प्रेयसीच्या घरासमोर गोंधळ घालून तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी प्रियकराविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सचिन मनोज मून (वय २०, रा. एकात्मतानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. ऑक्टोबरमध्ये २०वर्षीय तरुणीची फेसबुकवरून सचिनसोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. सचिनचा संशयी स्वभाव असल्याने तरुणीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले. त्यामुळे सचिन संतापला. मंगळवारी तो तरुणीच्या घरासमोर गेला. तरुणीला शिवीगाळ करून गोंधळ घालायला सुरुवात केली. तरुणीच्या भावाने त्याची समजूत घातली असता सचिनने त्याला ठार मारण्याची धमकी दिली व पसार झाला.
Users Today : 2